ठाणे -कामगार वसाहतीत असलेल्या गोदामाला आज सकाळच्या सुमारास आग लागल्याने या भीषण आगीत लगतच असलेल्या कामगार वसाहतीच्या घरालाही झळ पोहोचून यामध्ये १२० कामगारांच्या खोल्या जळून खाक झाल्या. तर या भीषण आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना कल्याण-शीळ रोडवरील उसरघर परिसरातील रुणावल माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज 2मध्ये घटना घडली आहे. तपन महालदार असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या कामगारच नाव असून सुरेश कुमार असे जखमी कामगाराचे नाव आहे.
कामगारांच्या 120 खोल्या आगीच्या भक्षस्थानी
डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-शीळ रोडवर उसरघर येथे असलेल्या रुणावल माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज 2मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीलगतच गोदामाला आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोदामालगतच असलेल्या या वसाहतीत कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 120 खोल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आग लागताच कामगारांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र तरीही या आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक कामगार भाजल्याने गंभीररित्या भाजला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव तपन महालदार असून सुरेश कुमार अस जखमी कामगाराचे नाव आहे.
आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज
या आगीची माहिती मिळताच अग्निशामकदलाच्या दोन गाड्यानी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक तपासणीत ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे अग्निशामक अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीत कामगार वसाहतीतील सर्व सामानाची राखरांगोळी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कामगारांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
ज्वालाग्राही रसायनामुळे अग्नीचे रौद्ररूप