ठाणे - शहरातील पश्चिमेस स्थित हिरानंदानी इस्टेट परिसरातील अकार्डिया शॉपिंग मॉल मध्ये आग लागली आहे. या इमारतीतील सहा दुकानं जळून खाक झाली आहेत. अद्याप कोणाचाही जीव गेला नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठाण्यातील हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये आग...सहा दुकानं जळून खाक! - fire in hiranandani complex
शहरातील पश्चिमेस स्थित हिरानंदानी इस्टेट परिसरातील अकार्डिया शॉपिंग मॉल मध्ये आग लागली आहे. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट असून या माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाला आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत किती नुकसान झाले आहे हे स्पष्ट झाले नाही.
या आगीत शॉपिंग कॉम्प्लेक्समधील वेगवेगळी 6 दुकानं जळून खाक झाली आहेत. गजबजलेल्या परिसरात सकाळच्या वेळी गर्दी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग पसरल्यामुळे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत आहेत. त्यामुळे आग विझविण्यात अडथळा येत आहे. मुबलक प्रमाणात मालमत्ता जळाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.