ठाणे - कामगार शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत अग्नितांडव सुरूच असून आज पुन्हा गोदामाच्या छतावरील भंगाराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
गोदामाच्या छतावर कापडी चिंध्या, पुठ्ठामुळे भीषण आग
ठाणे - कामगार शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत अग्नितांडव सुरूच असून आज पुन्हा गोदामाच्या छतावरील भंगाराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
गोदामाच्या छतावर कापडी चिंध्या, पुठ्ठामुळे भीषण आग
भिवंडी शहरालगतच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील अंजूरफाटा येथे मुनिसूरत कॉम्प्लेक्स आहे. या ठिकाणी असलेल्या गोदाम संकुलातील इमारतीच्या छतावर साठविलेल्या भंगाराला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. विशेष म्हणजे, दोन मजली गोदामाच्या छतावर कापडी चिंध्या, पुठ्ठा, प्लास्टिकची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली होती. त्याच साहित्याला अचानक आग लागल्याचे पाहून परिसरात घबराट उडाली होती. तर, गोदामातील सर्व कामगारांनी बाहेर पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ ते ५ पाण्याच्या टँकरच्या मदतीने ही आग तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. सध्या या ठिकाणी कुलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून ही आग नेमकी कशामुळे लागली यांचे कारण समजू शकले नाही.
ज्वालामुखींचे शहर म्हणून भिवंडीची नवीन ओळख?
भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात असलेल्या शेकडो गोदामांमध्ये बेकायदेशीरपणे रासायनिक द्रव्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात आहे. या बेकायदेशीर केमिकल साठ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. भिवंडीच्या गोदाम पट्ट्यात रासायनिक द्रव्याचा साठा व अन्य साधन सामुग्रीच्या गोदामांसह भिवंडी शहरातील यंत्रमाग कारखाने व इतर मिळून अंदाजे ८० ठिकाणी वर्षभरात आगी लागल्या आहेत. त्यामुळे, ज्वालामुखींचे शहर म्हणून भिवंडीची नवीन ओळख निर्माण झाल्याची चर्चा भिवंडीकर करताना दिसत आहे.