ठाणे- शहर व जिल्ह्यात आगीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मानपाडा परिसरातील कोठारी कंपाऊंडमधील पेप्सी आणि लेस वेफर्सच्या दोन गोदामांना अचानक आग लागली. या घटनेत आठ वाहने जळून खाक झाली आहेत.
ठाण्यात कोठारी कंपाऊंडमध्ये गोडाऊनला आग; आठ वाहने जळून खाक
गुरुवारी मध्यारात्रीनंतर लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत वित्त हानी झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गुरुवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत वित्तहानी झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनास्थळी माल भरून ठेवण्यात आलेल्या 12 गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली असून कूलिंगचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आगीचे नेमके कारण काय? याचा आता शोध घेतला जात आहे.
गोडाऊन परिसर म्हणून ओळख-
कोठारी कंपाऊंड हा परिसर मोठे-मोठे गोडाऊन असल्याने स्टोरेज भाग म्हणून ओळखला जातो, याच भागात अनेकदा आग लागण्याचे प्रकार झाले आहेत. जुन्या वायरिंग आणि विजेचा लोड कमी जास्त झाल्याने शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळेच हा प्रकार झाला असावा, असा अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे.