मीरा भाईंदर (ठाणे) - बिकट परिस्थिती निर्माण होऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यामुळे या बिकट परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिका अग्निशामक दल सज्ज झाले आहे.
रुग्णालयातील बिकट परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक दल सज्ज - Mira bhayandar covid hospital
कोरोनाचा बिकट परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिका अग्निशामक दल सज्ज झाले आहे.
विरारच्या विजय वल्लभ कोविड हॉस्पिटल मध्ये शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली होती. गेले काही दिवस अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. या घडणाऱ्या घटनेमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशी कोणतीही अघटित घटना मीरा भाईंदर शहरात घडू नये तसेच रुग्णालयाची सुरक्षा ठेवण्यासाठी चोवीस तास अग्निशामन दल रुग्णालयाबाहेर सज्ज झाले आहे.
पालिकेच्या रुग्णालयाबाहेर अग्निशामन दल तैनात
मीरा भाईंदर शहरातील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, स्व. प्रमोद महाजन सभागृहातील रुग्णालय, स्व. मीनाताई ठाकरे कोविड सेंटर, अप्पा साहेब धर्माधिकारी, समृद्धि कोविड सेंटर या कोविड रुग्णालया बाहेर अग्निशामक दलाची आग विझवणारी एक गाडी व ६ ते ७ कर्मचारी रुग्णालय ठिकाणी तैनात केले आहेत.हे कर्मचारी २४ तास सुरक्षेसाठी राहणार आहेत. यामुळे कोणतीही अघटित घटना घडणार नाही कदाचित अशी घटना घडली तर लगेच त्यावर नियंत्रण आणता येईल. अग्निशामक दलाकडून शहरातील सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात येत आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.