महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी परिसरात केमिकल फॅक्टरीला भीषण आग, पावसाने विझली आग - केमिकल फॅक्टरीला भीषण आग

तळोजा येथील न्यू केमिकल झोन मधील मोदी केमिकल फार्मा या कंपनीला सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने काही सेकंदातच रौद्ररूप धारण केले. या कंपनीत दोन वर्षांपूर्वी देखील आग लागली असल्याची माहिती येथील नागरिकांनी ( Fire breaks out in a chemical factory ) दिली.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Sep 8, 2022, 9:23 PM IST

Updated : Sep 8, 2022, 10:18 PM IST

ठाणे- नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी परिसरात एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग ( Navi Mumbai fire ) लागली आहे. अग्निशमन दलाच्या एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग या परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने पावसामुळे विझली ( chemical factory in Taloja MIDC area ) आहे.


तळोजा येथील मोदी केमिकल फार्मा लिमिटेड या कंपनीला गुरुवार 8 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तळोजा येथील न्यू केमिकल झोन मधील मोदी केमिकल फार्मा या कंपनीला सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने काही सेकंदातच रौद्ररूप धारण केले. या कंपनीत दोन वर्षांपूर्वी देखील आग लागली असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. त्याच बरोबर तुर्भे बोनसारी गावाजवळ बॉयलर फुटून आग लागली आहे. मात्र नवी मुंबई परिसरात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्याने आग विझली आहे.

मआयडीसी परिसरात केमिकल फॅक्टरीला भीषण आग,
Last Updated : Sep 8, 2022, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details