ठाणे - उल्हासनगरमध्ये एका प्लास्टिकची मणी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. ही घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या पेरूमल कंपाऊड मधील चौधरी प्लास्टिक कारखान्यात घडली. या भीषण आगीत लाखो रुपयांचे प्लास्टिकसह साहित्य जळून खाक झाले आहे.
धुराचे लोट पाहून परिसरात खळबळ
उल्हासनगर रेल्वे स्थानकानजीकच्या पुलाखाली पेरूमल कंपाऊंडमध्ये प्लास्टिक मणीपासून विविध वस्तू तयार केल्या जातात. मात्र आज दुपारच्या सुमारास अचानक या कारखान्यातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पाहून आतील कामगारांनी बाहेर पळ काढला. त्यामुळे या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. धुराचे लोट पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवले. मात्र, अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.
प्लास्टिक मणी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग - ठाणे प्लास्टिक कारखाना आग न्यूज
उल्हासनगरमध्ये एका प्लास्टिकची मणी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. या भीषण आगीत लाखो रुपये किंमतीच्या प्लास्टिकसह साहित्य जळून खाक झाले आहे.
![प्लास्टिक मणी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग Fire breaks out at plastic factory in Thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10069861-823-10069861-1609407728024.jpg)
प्लास्टिक मणी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग
प्लास्टिक मणी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग