ठाणे - अखिल भारतीय पुरोगामी मुस्लिम कल्याण समितीने भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात कलम १५३ए, १५३बी, २९५(अ) अंतर्गत वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबाबत एफआयआर नोंदवण्यासाठी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ( Ambernath Police Station FIR against suspended BJP leader Nupur Sharma ) नुपूर शर्मा यांच्यावर तिच्या वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्याचा तपास पोलीस विभागाने सुरू केला आहे. तिच्यावर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले ( dilip walse patil on Nupur Sharma FIR ) आहे.
मुंबई पोलीसही देणार समन्स! - ज्ञानवापी प्रकरणावरील चर्चेदरम्यान प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मुंबई पोलीस लवकरच भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मायांना समन्स पाठवणार आहेत. याबाबत जबानी नोंद घेण्यात येणार आहेत. अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. सविस्तर...