ठाणे - कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली नसून सर्वाना नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत कारवाई केली जात आहे. त्यातच भाजपने कल्याण डोंबिवलीत जनआशीर्वाद यात्रा काढून नागरिकांची गर्दी जमविल्याने कोरोना नियम पायदळी तुडवले. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील मानपाडा, कोळसेवाडी, महात्मा फुले आणि खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार डझनभराच्यावर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांच्या आदेशाचे पालन बंधनकारक असतानाच ठाणे जिल्ह्यात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा गेल्या दोन दिवसापासून ठिकठिकाणी काढण्यात येत आहे. हि यात्रा १९ ऑगष्टपर्यत सुरू राहणार असून या यात्रेत मनाई आदेशाचे उल्लंघन करत नागरिकांना एकत्र जमा करणे, मास्कचा वापर न केल्याने भा.दं.वि.कलम १८८,२६९,२७० सह साथीचा रोग कायदा १८९७ चे कलम २,३,४ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ( ब ) महा. पो.अधि.सन १९५१ चे कलम ३७ (१) १३५ प्रमाणे आयोजकांवर कल्याण डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे कालच ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात भाजपच्या आयोजक नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता त्या पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतही गुन्हे दाखल झाल्याने भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यामध्ये खळबळ माजली आहे.
इतरही पोलीस ठाण्यात गुन्हे होणार दाखल -