ठाणे- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनासह स्थानिक प्रशासनाने कोरोना नियमाचे निर्बध घालण्यात आले आहेत. मात्र असे असतांना अंबरनाथच्या जांभूळ भागात असलेल्या एस -3 पार्क या पंचताराकिंत हॉटेलमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवत मोठ्या धुमधडाक्यात कार्यक्रम १५० नागरिकांच्या उपस्थित हॉटेलमध्ये पार पडला होता. याप्रकरणी पोलीस नाईक प्रशांत गोसावी यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वर सिंग (वय, ३७ ) असे गुन्हा दाखल झालेल्या मॅनेजरचे नाव असून त्याच्यासह साहाय्यक मॅनेजर श्याम नवल गिरे अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गर्दीत 'गेट टूगेदर'चा कार्यक्रम धुमधडाक्यात -
ठाण्यात कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या पंचताराकिंत हॉटेलच्या दोन मॅनेजरवर गुन्हा दाखल - thane corona update
अंबरनाथच्या जांभूळ भागात असलेल्या एस -3 पार्क या पंचताराकिंत हॉटेलमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवत मोठ्या धुमधडाक्यात कार्यक्रम १५० नागरिकांच्या उपस्थित हॉटेलमध्ये पार पडला होता. याप्रकरणी पोलीस नाईक प्रशांत गोसावी यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथच्या जांभूळ भागात असलेल्या एस -3 पार्क नावाचे पंचताराकिंत हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये शेट्टी समाज बंड मुंबई कमिटीने गुरुवारी रात्रीच्या सुमाराला गेट टूगेदरचा धुमधडाक्यात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला १५० जणांची उपस्थिती होती. उपस्थित सर्वजण तोंडाला माक्स न लावताच गर्दीत वावरत होते. तसेच सामाजिक अंतरही राखलेले दिसून आले नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचे अंबरनाथ पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची दखल घेत हॉटेल मॅनेजर आणि आयोजकांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना काळात ५० पेक्षा जास्त गर्दी न जमवण्याचे आदेश असतांना हॉटेल मालक चालक मात्र त्याचे सर्रास उल्लंघन करत आहेत.