ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासूव मुंबईची लाईफलाईन समजली जाणीरी लोकल बंद होती. मात्र, आजपासून (सोमवार) मुंबईची लोकलसेवा काही अंशी सुरु करण्यात आली आहे. परंतु, ही लोकलसेवा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
मुंबईची 'लाईफलाईन' अखेर सुरू, फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच असणार सेवा - मुंबईची लोकल सुरु
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासूव मुंबईची लाईफलाईन समजली जाणीरी लोकल बंद होती. मात्र, आजपासून (सोमवार) मुंबईची लोकलसेवा काही अंशी सुरु करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्व व्यवस्था मूळ पदावर येण्यासाठी आणखी बराच वेळ वाट पाहावी लागेल, अशी चिन्हे दिसत असताना आजपासून मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. सदर लोकलसेवा ही मुंबईच्या मध्य आणि पश्चिम मार्गावर धावणार असून, यात केवळ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. जवळपास अडीच महिन्यानंतर सुरू होणाऱ्या लोकलमधून कामावर जाण्यासाठी अनेक कर्मचारी ठाणे रेल्वे स्थानकात आले होते. परंतु, वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सुटत नसल्याने त्यांचा खूप खोळंबा झाला.
इतर प्रवाशांनी गाडीतून जाण्यासाठी गर्दी करू नये, म्हणून रेल्वे स्थानकात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. गाड्या अत्यंत अनियमित धावत असल्याने बऱ्याच जणांनी आपली नाराजी व्यक्त केली.