ठाणे :कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्गवर ( Kalyan Nagar National Highway) मोरोशी गावा जवळच्या "न्याहाडी फाटा येथे रस्त्याच्या कडेला असलेली झाडे, माती रस्तावर कोसळली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याची भीती ( Fear of landslide ) निर्माण झाली आहे. मात्र, मुरबाड तालुका आपत्ती व्यवस्थान प्रशाकीय अधिकारी घटनास्थळी दाखल नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. घटनास्थळी केवळ महामार्ग पोलीसचे एक पथक काम करत आहे.
हेही वाचा -Thane City Becoming Unauthorized Buildings City : ठाण्यात अनधिकृत धोकादायक बांधकामांचे जाळे; "माळीण"च्या पुनरावृत्तीची शक्यता
गेल्या पाच दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ( Heavy rain in Thane ) पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सर्वच नद्यांना पूर आला आहे. याचा सर्वाधिक फटका कल्याण – नगर या राष्ट्रीय क्रमांक २२२ महामार्गाला बसला आहे. नगरहुन येणाऱ्या वाहनांना मुरबाड येथे थांबावे लागले आहे. तर याच मार्गे दूध व भाजी वाशी मार्केटला जाते. मार्गावर पाणी असल्यामुळे ही वाहने मुरबाड येथे अडकून पडली आहेत . दरड कोसळण्याच्या भीतीने दूध, भाजीपाला मार्केट वर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूने हजारो वाहनांसह शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत.
भूस्खलनाचे संभावित विभाग :दरम्यान, ठाण्यातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये हे नागरिक अनधिकृतपणे राहत असून, त्यांना पाणी आणि वीज कनेक्शनदेखील सहज उपलब्ध होत आहे. कळवा परिसरातील अत्कोनेश्वरनगर, भास्करनगर, पौडपाडा असा मोठा डोंगराचा परिसर या झोपड्यांनी व्यापला आहे. तर मुंब्रा बायपासवर तर हळूहळू झोपड्यांचे साम्राज्य प्रशासनाच्या डोळ्यांदेखत उभे राहत आहे. हे सर्व अनधिकृत झोपडपट्ट्यांना भूस्स्खलनाचा संभावित धोका आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून पावसाळ्यापूर्वी २६ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये रायलादेवी १२, कळवा ६, मुंब्रा ५, मानपाडा १ आणि वर्तकनगर २ अशा ठिकाणांचा समावेश आहे. येथे अतिमुसळधार पावसात अथवा अन्य काही कारणाने भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. मात्र, हे झोपड्यांचे साम्राज्य थांबविण्याची मानसिकता सरकारमध्येच नाही. स्थानिक संस्थांचे सोडा, अशी परिस्थिती आहे.
वनविभाग आणि पालिकेचा फक्त नोटीस प्रपंच :पुण्यासारखी भविष्यातील "माळीण"सारखी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी ठोस कारवाई करण्याऐवजी पालिका आणि वनविभागाने मात्र केवळ नोटीस देण्यातच धन्यता मानली आहे. नोटिसीचा प्रपंच करीत हातवर केल्याचे चित्र आहे. डोंगराच्या परिसरात राहणाऱ्या सर्व रहिवाशांना पालिकेच्या वतीने याधीच नोटीस देण्यात आल्या असून, त्यांना जागा सोडून जाण्यास सांगितले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. तर यासंदर्भात वन विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील नोटीस दिली असल्याचे सांगून पावसाळ्यापूर्वी काही ठिकाणी अतिक्रमण हटवण्यात आली आहेत.
हेही वाचा -SIT SAYS PATEL BEHIND DEFAMING GUJARAT : गुजरातच्या बदनामीमागे दिवगंत काँग्रेस नेते अहमद पटेल यांचा हात - एसआयटी