ठाणे - सुनेवर वैद्यकीय उपचार न करता अंगामध्ये शीरलेले भूत काढण्याच्या बहाण्याने एका नराधम सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून शारीरिक सुख घेण्यासाठी तिच्या अंगावर सुगंधी अत्तर शिंपडून जादूटोण्याच्या नावाखाली अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित सुनेने शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधम सासऱ्यासह पती आणि नंदोईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच आरोपींनी घरातून पळ काढला आहे. अलीमुल्लाह अब्दुल रौफ अन्सारी (वय 56) नराधम सासर्याचे नाव आहे. तर फैजू रहमान अन्सारी (27) हा पीडित महिलेचा पती असून तुफैल अन्सारी (30) असे नंदोईचे नाव आहे. त्याच्याच घरामध्ये हे कृत्य करण्यात आले.
सुनेवर जादुटोण्याद्वारे अघोरी कृत्य करून शरीरसुख घेण्याचा प्रयत्न; नराधम सासऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल - misbehave
27 वर्षीय सून आजारी नसताना तिच्या अंगता भूत शिरल्याचा बहाणा करुन सासऱ्याने शरीरसुख घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. चार दिवसांनतर घरातून पळ काढत तिने शांतीनगर पोलीस ठाण्यात सासरा, नवरा आणि नंदोईविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय विवाहिता ही आजारी नसताना सुद्धा तिच्या अंगामध्ये भूत शिरले आहे, असे सासऱ्याने आपल्या मुलाला सांगितले. यानंतर त्याने वाईट उद्देशाने तिला चार दिवसांपूर्वी आपला जावई तुफैल याच्या घरी नेले. तिथे त्याने बाहेरून कडी लावून एकटीला आपल्या समोर बसवले. यानंतर तिला अंगावरील कपडे काढुन अंतर्वस्त्र तसेच ठेवण्यास तिला सांगितले. तिच्या अंगावर सुगंध अत्तराच्या बाटल्या शिंपडून तिला मोहीत केले. तिचे डोक्यावरील केस कापून हातवारे करीत मंत्रोच्चार पुटपुटून आजा ओ आजा ओ असे आरडाओरडा करून सलग चार दिवस रात्रीच्या वेळेस जादुटोण्याचा अघोरी प्रकार करून तिला घरात कोंडून ठेवले होते.
दरम्यान, सलग चार दिवस होणाऱ्या जादुटोण्याच्या कृत्याला कंटाळून पीडितेने घरातून पळ काढत शांतीनगर पोलीस ठाणे गाठले, या ठिकाणी महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर तिने सर्व प्रसंग कथन केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013 चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण कबडी करीत आहेत.