नवी मुंबई - शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 2 जणांचा बळी गेला आहे. एपीएमसीमधील व्यापाऱ्याचे आज (शुक्रवारी) कोरोनामुळे निधन झाले असून 6 दिवसापूर्वी या व्यापाऱ्यांच्या मुलाचे देखील कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे अवघ्या 6 दिवसात कोरोनाने बाप-लेकाचा बळी घेतला आहे. यामुळे नवी मुंबई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवी मुंबईत कोरोनाने घेतला पिता-पुत्राचा बळी, मुलाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांत वडिलांचाही मृत्यू - APMC Market Corona news
एपीएमसी बाजारामुळे नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून काही दिवस मार्केट बंद करावे, अशी मागणी केली जात होती. नवी मुंबईत एकीकडे वाढते कोरोना रुग्ण त्यात कोरोनामुळे मृत्यू ही वाढत आहेत. यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.
एपीएमसी बाजारामुळे नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून काही दिवस मार्केट बंद करावे, अशी मागणी केली जात होती. नवी मुंबईत एकीकडे वाढते कोरोना रुग्ण त्यात कोरोनामुळे मृत्यू ही वाढत आहेत. यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. 23 मे रोजी एपीएमसी भाजीपाला व्यापारी राजेंद्र बारवे यांचा मुलगा रोशन बारवे (24) याचे कोरोनामुळे निधन झाले होते. मुलाच्या संपर्कात आल्याने राजेंद्र बारवे (55) यांनादेखील कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलाचे निधन झाले तेव्हा पासून सलग 6 दिवस राजेंद्र बारवे हे मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
अवघ्या 6 दिवसातच या बाप-लेकावर कोरोनाने घाला घातला आहे. तर याच महिन्यातील 11 मे रोजी राजेंद्र बारवे यांचे वडील विठ्ठल बारवे (92) यांचे वृद्धकापळाने निधन झाले होते. त्यामुळे अवघ्या 18 दिवसात बारवे कुटुंबातील 3 सदस्यांचे निधन झाल्याने संपूर्ण नेरूळ आणि एपीएमसीमधील व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात असून एपीएमसी कोरोनामुळे अजून किती जीव घेणार आहे, असा संतप्त सवालदेखील विचारला जात आहे.