ठाणे : शहापूर तालुक्यातील पाषाणे हद्दीत असलेल्या कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीमध्ये काही कोंबड्याचा मृत्यू झाला होता. त्याची तपासणी पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येऊन राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग विभागाकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यामध्ये कोंबड्याचा बर्ड फ्ल्यू या आजाराने मृत्यू झाल्याचा अहवाल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मौजे पाषाणे येथील व परिसरातील १ किमी बाधित क्षेत्रातील प्रभावित कुक्कुट वर्गीय पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कुक्कुटपालन शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
Bird Flu in Thane District : ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू; शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी - ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मौजे पाषाणे येथील व परिसरातील १ किमी बाधित क्षेत्रातील प्रभावित कुक्कुट वर्गीय ( Bird Flu in Thane District ) पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कुक्कुटपालन शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
bird flu
तालुक्यातील प्रभावित पोल्ट्री फार्म त्रिज्येतील कुक्कुट पक्षाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या जलद प्रतिसाद दलमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून उपाययोजना करणे, मृत्यू झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावणे, बाधित क्षेत्रातील पशुखाद्य, अंडी नष्ट करणे, बाधित क्षेत्रातील १ किमी परिसरात चिकन विक्री व वाहतूक संसर्गमुक्त क्षेत्र घोषित होत नाही तोपर्यंत निर्बध ठेवणे अशा उपाययोजना सांगितल्या आहे.
हजारो पक्ष्यांची विल्हेवाट, नुकसान भरपाईची मागणी
गुरुवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महसूल प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती विभाग यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सुरू केली आहे. परिसरातील ६ पोल्ट्री व्यावसायिकांच्या पोल्ट्रीमधील पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याची सुरवात केली आहे. विशेष म्हणजे हजारो पक्ष्यांची विल्हेवाट लावताना संबंधित पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी याची मागणी केली आहे.