ठाणे- मफतलाल कंपनीसाठी ( Mafatlal Company ) ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत व खरेदी केल्या त्यांना नवी मुंबईत 12.5 टक्क्यांऐवजी 15 टक्के जमीन द्यावी. तसेच न्यायालीयन आदेशानुसार कळवा येथील खारभूमी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी संघर्ष कृती सेवा संस्थेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ( Thane Collector Office ) धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
आता आगरी कोळी समाज एकत्र येत असल्याचे चित्र आंदोलनाच्या माध्यमातून दिसू लागले आहे. या आंदोलनाला नवी मुंबई आंंतरराष्ट्रीय विमानतळ दि.बा. पाटील नामांतर सर्वपक्षीय कृती समिती, अखिल आगरी समाज परिषद यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आत्तापर्यंत आम्ही शांततेत आंदोलने केली. मात्र, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आणि आक्रमक भूमिका घेऊन बेमुदत उपोषण करू, असा इशारा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिला आहे.