ठाणे - महान गायक मोहम्मद रफीचे चाहते अजूनही त्यांच्या आवाजाचे कौतुक करतात. आजही लोक त्यांची गाणी ऐकतात आणि त्याच्या आवाजानं मंत्रमुग्ध होतात. यामुळेच त्यांची गाणी प्रत्येकाच्या जिभेवर कायम असतात. दिवंगत गायक मोहम्मद रफींचा असाही एक चाहता ( Fan of Singer Mohammad Rafi ) ज्याने आयुष्यभर रफींचा गाण्यांचा ( Mohammed Rafi Songs ) संग्रह व आठवणी जिवापेक्षाही अधिक जपल्या आहेत. विशेष म्हणजे सुमारे 20 हजार गाण्यांच्या संग्रहासह त्यांच्या आठवणी आजही या जिंवत ठेवल्या आहेत. 70 वर्षीय रशीद मणियार असे त्यांचे नाव असून ते कल्याण पश्चिम भागातील मदार छल्ला परिसरात राहतात.
गायक मोहम्मद रफींचा चाहता... रफींच्या आठवणी सांगताना रशीद चाचा झाले भावूक -
रशीद यांचे कुटूंब गेल्या 150 वर्षापासून कल्याणमध्ये राहत असून लहानपणापासूनच त्यांना गायनाचा छंद आहे. त्यांचे वडिलोपार्जित बांगड्यां विक्रीचा व्यवसाय कल्याणातील मदार छल्ला परिसरात असून हा व्यवसाय सांभाळून त्यांनी गायक रफींच्या आठवणी आजही जिंवत ठेवल्या आहेत. 150 वर्षापासून त्यांचे कुटूंब एका 10 बाय 20 च्या बैंठ्या घरात राहतात. रशीद चाचाच्या त्याच खोलीत गायक रफींच्या सुमारे 20 हजार गाण्यांचा संग्रह जपून ठेवला. शिवाय 100 वर्षापूर्वीचे जुने ग्रामोफोनसह रेकार्ड पिल्यर तसेच शोकडो कॅसेटसह जुने टेपरिकॉट आजही त्यांच्याकडे अस्थित्वात आहेत. आज गायक रफींचे निधन होऊन 41 वर्ष झाले. मात्र त्यांच्या आठवणी सांगताना रशीद चाचा भावूक झाले होते.
गायक रफीमुळे चित्रपट सुष्टीकडे आकर्षित -
रशीद चाचा यांच्या मते गायक रफींनी 55 वर्षाच्या जीवनात 26 हजार पेक्षा विविध भाष्येतील गाणे गायले आहेत. त्यामध्ये 15 मराठी गाण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याकाळी श्रीकांत ठाकरे यांच्या आग्रह खातर त्यांनी 'शोधिसी मानवा देव हा मंदिरी' हे मराठी गायले होते. रशीद मणियार हे तरुणपणी चित्रपट सुष्टीकडे गायक रफीमुळे आकर्षित झाले. तेव्हापासूनच त्यांनी त्यांनीही गायनाचा छंद जोपासला आहे.
नव्या जमान्यातील बहुतांश गाणे भारतीय संस्काराला न शोभणारी -
गायक रफी साहेबामुळेच आतापर्यत 300 पेक्षा अधिक स्टेज शो केले असून 'अल्फा साज और आवाज' या नावानेही त्यावेळी ऑर्केस्ट्रा काढून गायक रफींच्या आठवणी गाण्यांच्या रूपात जिवंत ठेवल्याचे रशीद चाचाने सांगितले. आता मात्र वाढत वयोमानाने आणि प्रकृतीमुळे मला ऑर्केस्ट्रा हळूहळू बंद करावा लागल्याचे सांगत जोपर्यत माझ्या जीवात जीव आहे. तोपर्यत रफी साहेबांचे चित्रपट सुष्टीतील त्यांचे मोलाचे योगदान त्यांच्या इतरही चाहत्यांना नेहमीच सांगत राहणार असल्याचेही रशीद चाचा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. वयाच्या सत्तरी ओलांडलेल्या रशीद चाचांना मात्र आताच्या नव्या जमान्यातील बहुतांश गाणी ही भारतीय संस्काराला शोभणारे नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा -mumbai omicron update - मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ५ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ३६ वर