महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane Crime News : भावजयच्या साडे सहा लाखांच्या दागिन्यांवर नणंदने मारला डल्ला - thane stole incident

भावजयच्या बेडरूममधील कपाटातील साडे सहा लाखांच्या दागिन्यांवर नणंदनेच डल्ला मारल्याची घटना घडली ( family member stole jewellery ) आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील बाजारपेठ परिसरात असलेल्या एका इमारतीत घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात नणंद व तिच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Thane Crime News
सहा लाखांच्या दागिन्यांवर नणंदने मारला डल्ला

By

Published : Jun 11, 2022, 3:22 PM IST

ठाणे - भावजयच्या बेडरूममधील कपाटातील साडे सहा लाखांच्या दागिन्यांवर नणंदनेच डल्ला मारल्याची घटना घडली ( family member stole jewellery ) आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील बाजारपेठ परिसरात असलेल्या एका इमारतीत घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात नणंद व तिच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. फातिमा मुस्तफा कल्याणवाला (वय ४७) असे गुन्हा दाखल झालेल्या नणंदचे नाव आहे. तर मूर्तुजा शब्बीर बंगलोरवाला (वय ४१) असे गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.

कपाटाची चावी चोरली अन् दागिने केले लंपास -तक्रारदार तसनीम कादरभाई कल्याणवाला (वय ५१) ह्या कुटुंबासह कल्याण पश्चिम भागातील बाजारपेठ हद्दीत असलेल्या नफिस बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावर राहतात. त्यांच्या सोबतच आरोपी नणंदही राहते. त्यातच ९ जून रोजी सकाळच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून भावजय तसनीम यांच्या बेडरूममधील कपाटाची चावी चोरली. त्यानंतर चावीने कपाट उघडून त्यामधील ६ लाख ५२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरलेले दागिने भावाकडे -विशेष म्हणजे घरातील कोणाला संशय येणार नाही म्हणून नणंदने चोरी केलेले दागिने भिवंडी तालुक्यातील कशेळी टोल नाका भागातील इमारतीत राहणाऱ्या मूर्तुजा शब्बीर बंगलोरवाला यांच्याकडे दिले. दरम्यान दुसऱ्या दिवशी (१० जून) रोजी कपाटातील दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात येताच भावजय तसनीम यांनी नणंद आणि तिच्या भावा विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. मुढें करीत आहेत.

हेही वाचा -RS Election Result 2022 : 'अशा'प्रकारे जिंकले राज्यसभेचे उमेदवार.. पहा सत्ताधारी- विरोधकांच्या प्रतिक्रिया..

ABOUT THE AUTHOR

...view details