महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुटुंबाच्या भेटीसाठी आसुसलेल्या मनोरुग्णांना डॉक्टरांचा आधार - ठाणे

दिवाळीचा सर्वत्र जल्लोष सुरू असताना ठाण्यातील मनोरुग्णालयातील रुग्ण मात्र कुटुंबीयांच्या एका भेटीसाठी आसुसलेले दिसून येत आहेत.  मग काय डॉक्टर, नर्स, कर्मचारीच या रुग्णांचे नातेवाईक बनले आणि घरच्या फराळाने त्यांचे तोेंड गोड केले. इतकेच नव्हे तर रांगोळी, आकाश कंदील लावून संपूर्ण रुग्णालय घरासारखे उजळले.

Expect relatives to visit psychiatrists in Thane Mental hospital
ठाण्यातील मनोरुग्ण कुटुंबीयांच्या भेटीसाठी आसुसले नातेवाईक फिरकलतच नाहीत रुग्णालयाने दिला आधार

By

Published : Nov 11, 2021, 8:08 AM IST

ठाणे - आई-बाबा, भाऊ-बहिणी कुणीतरी येतील... फराळ आणतील... घरी घेऊन जातील... या आशेने बंद खोलीच्या जाळीतून वाटेकडे नजर लावलेले डोळे... पण दिवाळीही सरली. लक्ष्मीपुजन, पाडवा अन् भाऊबीजही... दिवाळीचा सर्वत्र जल्लोष सुरू असताना ठाण्यातील मनोरुग्णालयातील रुग्ण मात्र कुटुंबीयांच्या एका भेटीसाठी आसुसलेले दिसून येत आहेत. मग काय डॉक्टर, नर्स, कर्मचारीच या रुग्णांचे नातेवाईक बनले आणि घरच्या फराळाने त्यांचे तोेंड गोड केले. इतकेच नव्हे तर रांगोळी, आकाश कंदील लावून संपूर्ण रुग्णालय घरासारखे उजळले.

मनोरुग्णांना डॉक्टरांचा आधार
मानसिक आरोग्य ढासळलेल्या रुग्णांसाठी ठाण्यातील मनोरुग्णालय वरदान ठरले आहे. या मनोरुग्णालयात सुमारे 1 हजार 22 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये 628 पुरुष तर 394 महिलांचा समोवश आहे. त्यापैकी 40 हून अधिक रुग्ण हे बरेही झाले आहेत. मात्र, एकदा रुग्णालयात दाखल केले की जबाबदारी संपली अशी मानसिकता कुटुंबीयांची झाली असल्याचेच दिसून येत आहे. यातील शेकडो रुग्ण असे आहेत जे वर्षानुवर्षे येथे उपचार घेत आहेत. पण त्यांना भेटायला कुणीच येत नाही. वास्तविक रुग्ण कोणीही असो, कोणत्याही वयोगटातील असो, त्याला खरी गरज असते ती आपल्या कुटुंबीयांची. या रुग्णालयातील रुग्णांपैकी अनेकांना नातेवाईक नाहीत. मुलं मुली आपल्यासोबत ठेवायला तयार नाही किंवा हा त्रास खूप देतो, अंगावर धावून येतो, अशी कारणे देत वर्षातून एकदा घरी घेऊन जाण्यासही नातेवाईक तयार नसतात. त्यामुळे मनोरुग्णांची चिडचिड होते. खासकरून सणासुदीला. निदान दिवाळीला नातेवाईक भेटायला येतील, घरी घेऊन जातील अशी अपेक्षा या रुग्णांची असते.गेल्यावर्षी कोरोनाचे संकट मोठे होते. त्यामुळे दिवाळी साधेपणाने साजरी झाली. नातेवाईकांनी एकमेकांच्या गाठीभेटी टाळल्या. यंदाही कोरोनाचे संकट टळले नाही. पण गेल्यावर्षीपेक्षा यंदा उत्साह मोठा आहे. त्यामुळे यावर्षी तरी आई- बाबा, बहिण, भाऊ, काका, मामा किंवा आपली मुलं मुली कुणीतरी येतीलच या आशेने मनोरुग्ण वाटेकडे नजर लावून बसले होते. काहींचे नातेवाईक आलेही. पण ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच ठरली. त्यामुळे येथील रुग्णांचा हिरमोड झाला. पण तो क्षणीकच ठरला ते रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या मायेच्या उबमुळे. दिवाळी निमित्त रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण रुग्णालय दिवे, आकाशकंदील, रांगोळीने सजवले होते. येथील कर्मचाऱ्यांनी घरातून खास फराळ करून आणला होता. तो या रुग्णांना खाऊ घातला. त्यामुळे काही काळ का असेना या रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.समाजामध्ये मानसिक रुग्णांच्या प्रतीदुजाभाव, भेदभाव आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ईतका बदलला आहे कि बरे झालेल्या रुग्णांना देखील त्यांचे नातेवाईक किंवा कुटुंबातील कोणी, ना कधी त्यांना भेटायला आलेत किंवा त्यांना घरी जाण्यासाठी घ्यायला आलेत, असे 40 हुन अधिक बरे झालेले रुग्ण या रुग्णालयात कुटुंबीयांच्या भेटीसाठी आसुसले आहेत. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांच्या घराचे खोटे पत्ते देत रुग्णांना या मनोरुग्णालयात सोडून गेले आहेत.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांची मदत या रुग्णांना सण,उत्सव साजरा करता यावा यासाठी अनेक दानशूर व्यक्ती किंवा सामाजिक संघटना नेहमीच मदत करत असतात. मात्र, आपल्या नातेवाईकांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आणि घरी जाण्याच्या आशेवर असलेल्या रुग्णांची नेहमीच चिडचिड होत असते, मात्र रुग्णालयातील डॉक्टर,परिचारिका आणि रुग्णालय कर्मचारी त्यांची समजूत काढून त्यांचं त्यांची मनधरणी करत असतात.नातेवाईकांना उपचाराची गरजमानसिक रुग्ण म्हणून उपचार करण्यासाठी दाखल केलेले रुग्ण , आता चांगल्या पैकी बरे झाले आहेत. मात्र त्यांना रुग्णालयातच सोडून देणाऱ्या नातेवाईक किंवा मुला मुलींच्या विचारांवर आणि मानसिकतेवर उपचार करण्याची आता खरी गरज वाटतेय, असे मत डॉक्टर वक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details