महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात राज्यातील पहिल्या म्यूकरमायकोसिस ओपीडी सेंटरची निर्मिती - राज्यातील पहिल्या म्यूकरमायकोसिस ओपीडी सेंटर

ठाण्यात म्यूकरमायकोसिसचा धोका हा वाढू नये यासाठी ठाणे ग्लोबल कोविड हॉस्पिटल येथे म्यूकरमायकोसिस रोगासाठी ओपीडी सुरु केली आहे. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची येथे तपासणी केली जाते व या रुग्णांना ब्लॅक फंगसचे लक्षणे आढळली तर तात्काळ त्यावर उपचार करण्यात येतात.

म्यूकरमायकोसिस ओपीडी सेंटर
म्यूकरमायकोसिस ओपीडी सेंटर

By

Published : Jun 4, 2021, 7:40 PM IST

ठाणे -कोरोना रुग्णांची संख्या ही कमी जास्त होत असताना एकीकडे म्यूकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस या रोगाचा देखील धोका संभवत आहे. राज्यातील एकूण 18 जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. ठाण्यातही म्यूकरमायकोसिसचा धोका हा वाढू नये यासाठी ठाणे ग्लोबल कोविड हॉस्पिटल येथे म्यूकरमायकोसिस रोगासाठी ओपीडी सुरु केली आहे. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची येथे तपासणी केली जाते व या रुग्णांना ब्लॅक फंगसचे लक्षणे आढळली तर तात्काळ त्यावर उपचार करण्यात येतात. ठाणे शहरामध्ये म्यूकरमायकोसिसचे एकही तपासणी केंद्र नसून ब्लॅक फंगस या रोगासाठी ओपीडी असणे गरजेचे होते. व्यावसायिक डॉ. आशितोष खटावकर यांच्या प्रयत्नाने ग्लोबल हॉस्पिटल येथे ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

ठाण्यात राज्यातील पहिल्या म्यूकरमायकोसिस ओपीडी सेंटरची निर्मिती

'डिस्चार्ज झालेल्या प्रत्येक रुग्णाची तपासणी'

म्यूकरमायकोसिसच्या रोगाची आपण येथे रुग्णांची स्क्रिनींग करतो. डिस्चार्ज झालेल्या प्रत्येक रुग्णाची येथे तपासणी केली जाते. स्क्रिनींगच्या माध्यमातून नाकावाटे ब्लॅक फंगस गेला आहे की नाही, हे तपासले जाते व नंतर पुन्हा सात दिवसांनी बोलावले जाते. अशा प्रकारे 4-5 आठवडे अशी तपासणी केली जाते. जर रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस आढळले तर त्यांच्यावर पुढील उपचार केले जातात, अशी माहिती डॉ. तुषार गोरे यांनी दिली आहे.

डिस्चार्ज वेळी तपासणी
रुग्ण डिस्चार्ज होण्याआधी ही तपासणी केली जाते. तसेच बाहेरील रुग्णांसाठी वॉक इन सुविधा देखील आहे. रुग्णांचे अर्ली डिटेक्शन केल्याने फंगस येण्याचे प्रमाण कमी असते. जरी ब्लॅक फंगस आढळले तर गोळ्यांच्या स्वरूपात बरे करण्याचे प्रयन्त करू. सर्जरीची गरज लागली तर कळवा, राजीव गांधी मेडिकल कॉलेज येथे पुढील प्रक्रिया करण्यात येतील असे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा -महाविकास आघाडीत ''तीन तिगाडा काम बिगाडा'', लॉकडाऊन उठवण्याबाबत राज्य सरकारचा U-turn

ABOUT THE AUTHOR

...view details