नवी मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक २९ फेब्रुवारी पार पडली होती. संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी या निवडणूका घेण्यात आल्या. यामध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर सोमवारी निवडणुकांचे निकाल हाती आले असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी कर्मचारी माथाडी मापाडी यांच्यात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 29 फेब्रुवारीला पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारला एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोगही आजमावला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप व शिवसेना यांनी आपले पॅनल बनविले होते, तर भाजपही या निवडणुकीत आपली स्वतंत्र भूमिका घेऊन सहभागी झाले होते. मात्र पाचही बाजारातील व्यापारी प्रतिनिधी कोणत्याही पॅनल मध्ये सहभागी झाले नव्हते. फळबाजारमधील निवडणूक बिनविरोध पार पडल्याने संजय पानसरे यांना कौल देण्यात आला. मात्र, कांदा बटाटा बाजारात पूर्व संचालक अशोक वाळुंज आणि कांदा बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्यात चुरशीची लढत होती. मात्र, शेळके यांना मात देत अशोक वाळूंज हे विजयी झाले आहेत.
भाजीपाला बाजारात चार उमेदवार उभे होते, यात माजी संचालक शंकर पिंगळें आणि के. डी. मोरे यांच्यात चुरशीची लढत होती. मात्र, चारही उमेदवारांना मात देत 996 मते मिळवून शंकर पिंगळे हे विजयी झाले आहेत.
हेही वाचा-प्रेम न करण्याची शपथ घेतलेल्या कॉलेजमधील विद्यार्थिनीचा 'प्रेमविवाह'