ठाणे : धनुष्यबाण चिन्ह ( Dhanushyban ) वाढीसाठी आयुष्यभर जी बाळासाहेब ठाकरेंनी मेहनत घेतली होती. ती दोघांच्या भांडणात निवडणूक आयोगाने ( Election Commission temporarily bans Dhanushyabana ) गोठविली. हे खूप क्लेशदायक आहे. वडिलांनी जे कमावले होते ते मुलांनी एका मिनिटांमध्ये घालविले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Senior leader of NCP Eknath Khadse ) यांनी डोंबिवलीत व्यक्त केली. डोंबिवलीतील कल्याणकारी सामाजिक संस्था आयोजित कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Eknath Khadse : धनुष्यबाण चिन्ह गोठविणे क्लेशदायक - एकनाथ खडसे - Election Commission temporarily bans Dhanushyabana
धनुष्यबाण चिन्ह ( Dhanushyban ) वाढीसाठी आयुष्यभर जी बाळासाहेब ठाकरेंनी मेहनत घेतली होती. ती दोघांच्या भांडण्यात निवडणूक आयोगाने ( Election Commission temporarily bans Dhanushyabana ) गोठविली. हे खूप क्लेशदायक आहे. वडिलांनी जे कमावले होते ते मुलांनी एका मिनिटांमध्ये घालविले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Senior leader of NCP Eknath Khadse ) यांनी डोंबिवलीत व्यक्त केली. डोंबिवलीतील कल्याणकारी सामाजिक संस्था आयोजित कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) डोंबिवलीत आले होते.
धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा - खडसे पुढे म्हणाले, शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी आयुष्याचा ६० वर्षाहून अधिकचा काळ शिवसेना वाढीसाठी, धनुष्यबाण चिन्ह संवर्धनासाठी खर्च केला. धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. महाराष्ट्रात धनुष्यबाण म्हणजे शिवसेना अशी परिस्थिती आहे. हे वातावरण निर्माण करण्यात शिवसेनाप्रमुखांचे मोठे योगेदान आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांना भेटल्या त्याचवेळी त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांची चौकशीतून सुटका होईल असे वाटले. ते खरे ठरले. या प्रकरणाचे भवितव्य आता अंधकारमय आहे. अनेकांप्रमाणे माझेही फोन ६८ दिवस अभिवेक्षण केले जात होते. हे करण्या मागचे कारण काय हे मला आतापर्यंत समजले नाही. मागणी करुनही कळविले नाही, असे खडसे यांनी सांगितले.