महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या ठाण्यातील वृद्धाने केले मतदान - thane assembly election 2019

रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या जादव वाघेला यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान करून मतदान न करणाऱ्यांना लाजवेल असे उदाहरण त्यानी समाजासमोर ठेवले आहे. अपघात झाला असला तरी गेली 20 वर्ष वाघेला मतदान नियमितपणे करतात.

जादव जयराम वाघेला

By

Published : Oct 22, 2019, 10:28 AM IST

ठाणे- लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्‍क बजावला पाहिजे. हा हक्‍क न चुकता अनेकजण बजावत असतात. रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या जादव जयराम वाघेला (वय 60) यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान न करणाऱ्यांना एकप्रकारे शिकवण दिली आहे.

हेही वाचा -मालवणीत तृतीयपंथी बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क

ठाण्यात सर्वत्र विधानसभा मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात 20 वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या जादव वाघेला यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान करून मतदान न करणाऱ्यांना लाजवेल असे उदाहरण त्यानी समाजासमोर ठेवले आहे. अपघात झाला असला तरी गेली 20 वर्ष वाघेला मतदान नियमितपणे करतात. मतदान करताना मात्र बटन दाबण्यासाठी ते आपल्या पत्नीला घेऊन मतदान कक्षेत जातात. दोन्ही हात नसल्याने त्यांची पत्नी सविता वाघेला ईव्हीएम मशीनचे बटन दाबून मतदानाचा हक्क बजावत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details