ठाणे -ठाण्याच्या रायगड आळी, चंदनवाडी येथील जाई इमारतीच्या लिफ्टच्या डकमध्ये पडून एका ( One dies in falling Lift dock ) व्यक्तीचा मृत्य झाला आहे. नारायण धोंडू बेलोसे ( ६६ ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी दाखल होत आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने मृतकाला खेचून वर काढले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
Thane Crime : लिफ्टच्या डकमध्ये पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू - वृद्ध व्यक्तीचा लिफ्टमध्ये मृत्यू
नारायण धोंडू बेलोसे ( रा. जाई बिल्डींग, रायगड आळी, चंदनवाडी ठाणे) हे बुधवारी अचानक गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान बेलोसे हे बुधवारीच लिफ्टच्या ( One dies in falling Lift dock ) डकमध्ये पडले. हे कुणाला माहीतच झाले नाही. शुक्रवारी दुर्गंधी सुटल्याने केलेल्या तक्रारीनंतर संध्याकाळच्या सुमारस हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टच्या डकमध्ये खाली पडलेल्या बेलोसे यांना बाहेर काढले.
नारायण धोंडू बेलोसे ( रा. जाई बिल्डींग, रायगड आळी, चंदनवाडी ठाणे) हे बुधवारी अचानक गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान बेलोसे हे बुधवारीच लिफ्टच्या डकमध्ये पडले. हे कुणाला माहीतच झाले नाही. शुक्रवारी दुर्गंधी सुटल्याने केलेल्या तक्रारीनंतर संध्याकाळच्या सुमारस हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टच्या डकमध्ये खाली पडलेल्या बेलोसे यांना बाहेर काढले. दरम्यान बोलोसे हे लिफ्टच्या डकमध्ये कसे पडले ? आणि कधी पडले ? याचा तपास सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाने दिली आहे. या सोसायटीमध्ये अनेक लिफ्ट आहेत. या लिफ्ट व्यवस्थित बंद होत नाहीत. त्यामुळे त्यातून पडून अपघाती मृत्यू झाला असावा, असा अंदाज स्थानिक वर्तविला जात आहेत. मात्र अशा अपघातांना रोखण्यासाठी गृहनिर्माण संस्था काहीच प्रयत्न करताना दिसत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष वक्त होत आहे.
हेही वाचा -Mira Bhayandar : रुग्णालयात चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे पालकांचा ठिय्या