ठाणे -महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागलं. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यावर तातडीने शिंदेंनी कामाला सुरुवात केली. पहिल्याच बैठकीत सर्वाधिक निर्णय ठाण्यासाठी घेऊन यंत्रणा कामाला लावल्या. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने त्यांचे शहराच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की ठाण्याचे असा सवाल उपस्थित होत ( Eknath Shinde Chief Minister of Maharashtra or Thane ) आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाण्यातील सर्वच कामांना गती आली आहे. एकूणच ठाण्यातील कामांची गती पाहता उर्वरित महाराष्ट्राचा विकास कधी होणार?, असा सवाल उपस्थित होत आहे. जो न्याय ठाण्याला देत आहेत तो उर्वरित महाराष्ट्राला मिळावा. तर, ठाण्यातील नागरिक मुख्यमंत्र्यांच्या कामावर खुश आहेत. मुख्यमंत्री नसताना देखील संपूर्ण महाराष्ट्र दौरा शिंदेंनी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला नक्कीच चांगला विकास होईल, अशी ठाणेकरांच्या भावना आहेत.
ठाण्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय दिले ठाण्याला? - ५० एमएलडी अतिरिक्त पाण्याचा पुरवठा ठाण्याला मिळणार, ठाणे खड्डे मुक्त होणार, आपत्ती व्यवस्थापनसाठी अतिरिक्त यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ठाणे शहराला दररोज 485 दशलक्ष मिलिलिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे तो देखील अपुरा पडू लागला होता. मध्य वैतरणा जलाशयाची उंची वाढवण्यात आल्याने जास्त पाणी अडवणे शक्य होत असल्याने आता ठाणे शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेने मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पाणी तातडीने देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार ठाणे शहराची तातडीची गरज भागवण्यासाठी जलसंपदा विभागाने 50 एमएलडी पाणी येत्या 1 ऑगस्ट पासून ठाणे शहराला देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पदग्रहण केल्यानंतर शहराला मोठी भेट मिळाली आहे.
हेही वाचा -Aaditya Thackeray : शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना, 'शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी...'