महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 16, 2019, 4:46 PM IST

ETV Bharat / city

नवी मुंबईत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले... हिरव्या वाटाण्याची आवक वाढली.. जयपुरी गाजरही बाजरात दाखल...

भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले

ठाणे - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळभाज्यांची आवक वाढली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी भाज्यांच्या ज्या किमती होत्या, त्यात आता घट झाली आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्या आणखी स्वस्त झाल्या आहेत. सध्या प्रत्येक भाजीचे दर जवळपास १० ते २० रुपयांनी कमी झाले आहेत.

नवी मुंबईत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्याचे भाव घटले...

हेही वाचा... नटसम्राट डॉ. श्रीराम लागूंचा आज ९२ वा वाढदिवस

महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे आदी भागातून तर देशातील मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, अहमदाबाद या भागातून या ठिकाणी भाजीपाल्याची आवक होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकचे टोमॅटो आणि गुजरातचा हिरवा वाटाणा यासाही विशेष मागणी आहे. बाजारात मौसमी वाटाणा आला असल्यामुळे ७० ते ८० रुपये दराने मिळणारा वाटाणा सध्या बाजारात ३० ते ४० रुपये किलोने विकला जात आहे.

हेही वाचा.. आज उघडणार शबरीमला मंदिराचे दरवाजे, न्यायालयाच्या आदेशानंतरच मिळणार महिलांना प्रवेश

शनिवारी बाजारात प्रथमच चवीला मधूर असणारे जयपुरी गाजरही दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे फ्लॉवर, वालाच्या शेंगा, कोबी, वांगे, भेंडी, दोडके, दुधी भोपळा, गवार, टोमॅटो आदी फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहेत. मात्र, पालेभाज्यांचे दर अजूनही जैसे थे तसेच आहेत. पावसामुळे भाज्या खराब झाल्याने चांगल्या प्रतीची भाजी बाजारात दाखल होण्यास अजून एक महिना तरी लागेल, असे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा... रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भीषण अपघात; 13 वर्षीय मुलासह वडिलांचा मृत्यू

बाजारातील आजचे (शनिवारी) भाज्या व त्यांचे दर पुढील प्रमाणे... (दर प्रति किलो मध्ये)

  • वालाच्या शेंगा - २० रुपये किलो
  • कोबी - १० ते १५ रुपये किलो
  • वांगी - १६ रुपये किलो
  • भेंडी - २५ रुपये किलो
  • गवार - ४० रुपये किलो
  • टोमॅटो - २५ रुपये किलो
  • हिरवा वाटाणा - ३० ते ४० रुपये किलो
  • गावराण मिरची - २० रुपये
  • लवंगी मिरची - २०
  • आले - ५० रुपये
  • घोसाळे - २४ रुपये

पालेभाज्या जुडीपाले भाज्यांच्या किमती

  • मेथी - ३० रुपये
  • शेपू - १५ ते २०
  • पालक - २० ते ३०
  • कोथिंबीर - १५ ते २०

हेही वाचा... झटपट श्रीमंत होण्यासाठी व्यापाऱ्याचे केले होते अपहरण; अवघ्या सहा तासांत आरोपी ताब्यात!

ABOUT THE AUTHOR

...view details