ठाणे -करोडो रुपयांच्या जाहिराती आणि करोडो रुपयांचे होर्डिंग असा इतिहास असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांचा वाढदिवस ठाण्यातील रस्त्यांवर कुठेही पाहायला मिळत नाही. कारण दरवर्षी होणारा करोड रुपयांचा खर्च यावर्षी शिवसेना पक्षातील बंडखोरीमुळे झालेला दिसत नाही. यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे पोस्टर कुठेही पाहायला मिळत नाही. खासदार राजन विचारे यांनी लावलेला एकमेव पोस्टर हा ठाण्यात आता चर्चेचा विषय झाला आहे.
संघर्षाचा ठाण्यात वेगळा परिणाम - सत्तांतरानंतर महाराष्ट्रात प्रामुख्याने शिवसेनेचे दोन गट पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे गट व दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट. परंतु, या संघर्षाचा ठाण्यात वेगळा परिणाम देखील दिसून येत आहे. तर, उद्धव ठाकरे यांच्यावरील ठाण्यातील शिवसैनिकांचे प्रेम कमी झाले आहे काय? असा सवाल उद्भवत आहे.
वाढदिवसाचा फक्त एकच बॅनर - शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात महाराष्ट्रभर साजरा केला जातो. त्यातच ठाणे शहरात देखील मोठ-मोठे होर्डिंग व मोठ-मोठे बॅनर लावून शिवसेनाप्रमुखांना शुभेच्छा दिल्या जातात. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देखील उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. परंतु, यावर्षी राजकीय चित्र पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा फक्त एकच बॅनर ठाणे शहरातील मध्यवर्ती असलेल्या मासुंदा तलावाच्या इथे पाहायला मिळत आहे.