महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिघ्यात कॅफे शॉपमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग, चारचाकी जळून खाक - Short circuit In Navi Mumba

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिघा परिसरातील गणपती पाड येथील काॅफी शॉपला आग लागली. ही आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

due-to-short-circuit-in-digha-area-of-navi-mumbai-cafes-caught-fire
दिघ्यात कॅफे शॉपमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

By

Published : Nov 27, 2019, 6:55 PM IST

नवी मुंबई - महानगरपालिका क्षेत्रातील दिघा परिसरातील गणपती पाडा येथील कॅाफी शॉपला आग लागली. दोन मजली इमारत या आगीत जळून खाक झाली आहे. संबंधित इमारतीत कॅफे शॉपमधील काही कर्मचारी अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, इमारतीच्या आवारात पार्क केलेली दुचाकी व चारचाकी आगीत जळून खाक झाली आहे.

दिघ्यात कॅफे शॉपमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

दिघ्यातील गणपती पाडा परिसरात मयूर टाईल्स या इमारतीच्या तळमजल्यावर टाइल्सचे दुकान असून वरच्या मजल्यावर हा कॅफे शॉप सुरू होता, कॅफे शॉपच्या तळमजल्यावर शॉट सर्किट झाल्याने आग लागण्याची घटना घडली, तळमल्यावर असलेल्या लाकडी सामाना मुळे ही आग अधिकच पसरली. सलग दोन तास ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details