ठाणे -संततधार पावसामुळे आज महापालिकेच्या मुख्यालयाच्या मागील बाजूस रस्त्यावर १ ते दीड फूट पाणी साचले आहे. त्यातूनच नागरिक आपली वाट काढत जात आहे. तर वाहन धारकांनाही वाहन चालवताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठाण्यात मुसळधार, अनेक भागात साचले पाणी - Vandana Cinema area
ठाण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे पालिकेने केलेल्या नाले सफाईचा दावा फोल ठरताना दिसत आहे.
ठाण्यात मुसळधार
सकाळपासून आज ठाण्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. दिवसभरात ३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे वंदना सिनेमा परिसरात तसेच वंदन एसटी डेपोच्या बाहेर सखोल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे पालिकेने केलेल्या नाले सफाईचा दावा फोल ठरताना दिसत आहे. या बाबत नागरिकांनी पालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Last Updated : Jul 24, 2019, 11:30 PM IST