महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी कुत्र्याला जिवंत जाळले! प्राणीमित्रांकडून कठोर कारवाईची मागणी - Thane kingkongnagar crime

घोडबंदरवरील किंगकाँग नगरमध्ये गर्दुल्ले आणि चरस पिणाऱ्यांचा सतत वावर असतो. त्यांनी भटक्या कुत्र्याला ठार केले. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या नराधमांकडून हे कृत्य माणसांच्या बाबतीतदेखील घडू शकते, अशी भीती प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे.

जाळून टाकलेले कुत्रे
जाळून टाकलेले कुत्रे

By

Published : Nov 21, 2020, 5:42 PM IST

ठाणे- कुत्र्याला जिवंत जाळण्याची घटना ठाण्यातील घोडबंदरवरील वाघबीळ जवळ असलेल्या किंगकाँग नगरमध्ये घडली आहे. चरस व गांजाच्या आहारी गेलेल्या काही तरुणांनी शुक्रवारी रात्री भटक्या कुत्र्याला मारून जाळून टाकले. त्यांचे हे कृत्य कळताच प्राणिमित्रांनी पोलिसांसोबत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यत निष्पाप जीव जळून खाक झाला होता.

घोडबंदरवरील किंगकाँग नगरमध्ये गर्दुल्ले आणि चरस पिणाऱ्यांचा सतत वावर असतो. त्यांनी भटक्या कुत्र्याला ठार केले. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या नराधमांकडून हे कृत्य माणसांच्या बाबतीतदेखील घडू शकते, अशी भीती प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे.

प्राणीमित्रांकडून कठोर कारवाईची मागणी

हेही वाचा-अमली पदार्थ प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल चौकशीसाठी हजर

गुन्हा दाखल व्हावा नागरिकांची मागणी-
यापूर्वी ठाण्यातल्या वृंदावन परिसरामध्येदेखील विषप्रयोग करून अनेक भटक्या कुत्र्यांचा जीव घेण्यात आला होता. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नसते. याचाच फायदा घेत असे गुन्हेगार वारंवार कृत्य करतात. या परिसरात काही मद्यपींचा हैदोस नेहमीच सुरू असतो. याच्या अनेक तक्रारीदेखील पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा-अमली पदार्थ तस्करी प्रकरणी डीआरआयची कारवाई; ४ जणांना अटक


अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू-
बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांच्या संदर्भात 'ड्रग्ज सिंडिकेट तपास करत असलेल्या एनसीबीकडून पुन्हा एकदा मुंबईतील अंधेरी, वर्सोवा याठिकाणी अमली पदार्थांच्या संदर्भात छापेमारी करण्यात आली. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित काही व्यक्ती व टीव्ही कलाकारांचाही समावेश आहे. कॉमेडियन भारती सिंहच्या मुंबईतील अंधेरी लोखंडवाला येथील घरावरसुद्धा छापा मारण्यात आला. त्यानंतर तिला आणि तिचा पती हर्ष लिंबचिया यांना ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी अभिनेता अर्जून रामपाल, दीपिका पदुकोन, सारा अली खान, फिरोज नाडियाडवाला यांचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details