ठाणे - हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत गोंधळ घालून आरडाओरड करणाऱ्या तरुणांना शांत राहण्याचा सल्ला देणे पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. डझनभर टवाळखोर तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई-नाशिक महार्गावरील हॉटेल ट्युलिपमध्ये घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात १२ तरुणांवर गुन्हा दाखल ( Thugs beaten police in Thane ) करण्यात आला.
ग्राहकांसमोर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण -शहापूर तालुक्यातील खर्डी आऊट पोस्टवर राठोड हे पोलीस कर्मचारी ( Rathod police beaten in Thane ) कार्यरत आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी हॉटेल ट्युलिपमध्ये जेवणासाठी ( Hotel Tulip Thane ) गेले होते. त्यावेळी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काही मित्र एकत्र येत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हॉटेलमध्ये या टवाळखोर तरुणांनी जोरजोरात आरडाओरड करीत होते. यावरून हाॅटेल मालकाने तरुणांना शांत राहण्यास सांगितले.
हॉटेलमध्ये उडाला गोंधळ- वाढदिवसाच्या पार्टीतील काही तरुणांनी आणखीच गोंधळ घातला. हाॅटेल मालकाने गोंधळ घालणाऱ्या तरुणांना शांत करण्यासासाठी पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले. त्यानंतर पोलीस कर्मचारी राठोड यांनी त्या तरुणांना आरडाओरड करू नका. शांतपणे वाढदिवस साजरा करा, असे सांगताच टवाळखोर तरुणांनी अचानक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीमुळे हॉटेलमध्ये आणखीच गोंधळ उडाला.
सर्वच आरोपी फरार -पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करतानाची घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी राजकीय दबाव आल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीदेखील पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या १२ तरुणांवर विविध कलमानुसार आज पहाटे उशिरा गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी आरोपी तरुणांची नाव देण्यास नकार दिला. तर आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली आहे.