ठाणे - डोंबिवलीतील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी ३३ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. यातील २२ आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपींना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, प्रकरणातील २ अल्पवयीन आरोपींची यापूर्वीच भिवंडीतील बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली होती.
हेही वाचा -Physical abuse : चुलत बहिणीवर केला अत्याचार, भिवंडी परिसरातून एकास अटक
न्यायालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
डोंबिवली बलात्कार प्रकरणात एकूण ३३ आरोपी आहेत. त्यापैकी २२ आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी मानपाडा पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयात केली होती. यावर युक्तिवाद होऊन जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला. आरोपींना न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सलग नऊ महिने केले अत्याचार
15 वर्षीय पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. २२ जानेवारी २०२१ ला तिच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने अत्याचार करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. तेव्हापासूनच तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. डोंबिवली, बदलापूर, मुरबाड व रबाळे या परिसरांत आरोपींनी २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत म्हणजे, ९ महिन्यांपर्यत तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता.
हेही वाचा -CCTV : रस्त्यावर पडललेल्या गॅपमुळे एकच ठिकाणी चार अपघात, प्रशासनाचे दुर्लक्ष