ठाणे- डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल आहे. ४० वर्षापूर्वी उभारण्यात आलेला हा पूल २७ मे पासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्देश मध्य रेल्वे विभागीय प्रबंधकांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला दिला आहे. यामुळे डोंबिवली शहरवासीयात खळबळ माजली आहे. हा पूल बंद झाला मोठी वाहतूक समस्या निर्माण होणार आहे.
डोंबिवलीच्या रेल्वे उड्डाणपुल संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय - रेल्वे उड्डाणपुल
उड्डाणपूलावरील वाहतूक २७ मे पासून बंद केली तर, डोंबिवलीत वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. कारण, जोशी हायस्कूल बाजूला बांधण्यात आलेला नवा पूलावर अवजड वाहनांना बंदी आहे.

उड्डाणपूलावरील वाहतूक २७ मे पासून बंद केली तर, डोंबिवलीत वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. कारण, जोशी हायस्कूल बाजूला बांधण्यात आलेला नवा पूलावर अवजड वाहनांना बंदी आहे. जुन्या पुलावरुन हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिल्यास बराच प्रश्न कमी होणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी म्हणाल्या, महापालिकेस फक्त पत्र प्राप्त झाले आहे. आयआयटीचा अहवाल प्राप्त झाला नाही. तो प्राप्त झाल्यावर त्यासंबंधात निर्णय घेण्यात येईल. मात्र, रेल्वे प्रशासनाने पत्रासोबतच अहवाल पाठविल्याचा दावा केला आहे. यामुळे महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यात वाद होण्याची चिन्हे आहेत.