ठाणे -ज्या विद्यार्थ्यांच्या घरातील मंडळींनी लस घेतली असेल, त्या विद्यार्थ्याला बक्षीस मिळणार, त्याचे सत्कार होणार.. हे एकूण आश्चर्य वाटते न! पण हे खरे आहे. ठाण्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे बक्षीस मिळणार आहे. यामुळे ज्या विद्यार्थाला बक्षीस मिळाले नाही, ते आपल्या घरातील मंडळींना प्रवृत्त करतील व लस घेण्यासाठी आव्हान करतील, अशी कल्पना ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांना सुचली आहे.
माहिती देताना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हेही वाचा -Matrimonial Sites Fraud : तब्बल 41 महिलांची कोट्यवधींची फसवणूक करणारा 'लखोबा' गजाआड
अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई
ग्रामीण भागात लसीकरण कमी प्रमाणात होत आहे. यासाठीच ठाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाला वेग मिळावा म्हणून एक नवीन शक्कल लढवली आहे. तर, जे लोक लसीकरणाबाबत अफवा पसरवत असतील त्यांच्यावर आता प्रशासनाची करडी नजर असणार असून, अशा समाजकंटकांवर कारवाईचा बडगा आता उगारला जाणार आहे. तर, रात्रीच्या वेळेसही लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याचबरोबर स्पेशल कॉल सेंटर लसीकरणासाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
कोरोना काळात लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लस कमी आणि लोक जास्त, असे समीकरण होते. परंतु, आता उलट परिस्थिती आहे. आता लसी आहेत, मात्र लोक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती ठाणे ग्रामीण भागाची आहे. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत, त्यातही फक्त भिवंडी पालिकेच्या हद्दीत सर्वात कमी म्हणजे, ६८ टक्के लसीकरण झाले आहे. बाकी पालिकांच्या हद्दीत बऱ्यापैकी ८०, तर ८५ टक्के लसीकरण झाले आहे. तर शहरी भागात लसीकरण हे जवळपास ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. परंतु, ग्रामीण भागातील लसीकरण हे ७५ टक्केच्या आसपास आहे. खासकरून ठाण्यात शहापूर व मुरबाड भागांत लसीकरण कमी होत आहे. काही लोकांना भ्रम झालाय की, करोना संपलाय. तर, आदिवासी भागात कोणतीही लस घेण्याची सवय लोकांना नाही, त्यामुळे ते लस घेण्यास घाबरत आहेत. यासाठीच आता ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष देऊन लसीकरण कसे वाढवता येईल, याकडे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा कल आहे. यासाठी ग्रामीण भागात स्पेशल कॉल सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुरबाड सारख्या भागात सर्वच लोक कामानिमित्त गावाच्या बाहेर जातात आणि ते रात्रीच आपल्या गावात परततात. यासाठीच मुरबाडसारख्या अतिदुर्गम भागात रात्रीही आता लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -Raj Thackeray Thane : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतला 'मामलेदार मिसळ'चा आस्वाद