ठाणे- गेली अनेक वर्षे ठाणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमत नसल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. ठाण्यात रविवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या दोन गटामध्ये तुफान घोषणाबाजी पाहायला मिळाली. विद्यमान अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि युवा नेता महेश पाटील यांचे समर्थक एकमेकांसमोर भिडले होते. पक्ष श्रेष्टीसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना मानस्तप सहन करावा लागला.
पक्ष श्रेष्ठींसमोरच ठाणे काँग्रेस कार्यकर्त्यांचा धिंगाणा; दोन गटांत जोरदार घोषणाबाजी - ठाणे महानगर पालिका निवडणूक तयारी
पक्षश्रेष्ठीं समोरच ठाणे काँग्रेस कार्यकर्त्यांचा धिंगाणा झाल्याचा प्रकार ठाण्यात पाहायला मिळाला. चहापान कार्यक्रमासाठी एकत्रआलेल्या नेत्यासमोर दोन गटांची घोषणाबाजी झाली. या प्रकारामुळे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना मनस्ताप सहन करावा लागला.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा धिंगाणा
राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे ठाणे महापालिका निवडणुकीसाठी देखील काँग्रेस तयारी करत आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच पक्षांतर्गंत वाद चव्हाट्यावर आला आहे.
Last Updated : Jun 21, 2021, 6:46 AM IST