ठाणे- ढाब्यावर जेवणाचे बिल न देताच जाणाऱ्या तरुणाला ढाबा चालकाने बिल मागितले. त्यावर एका टवाळखोर तरुणाने शिवीगाळ करत ढाबा चालकाला मारहाण केली. ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ( Hotel owner beaten in Thane ) कैद झाली आहे.
Dhaba owner beaten incident in CCTV : भिवंडीत जेवणाच्या बिलावरून ढाबा चालकाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद - Dhaba owner beaten over food bill
भिवंडी तालुक्यातील कासणे गावाच्या हद्दीत प्रमोद एकनाथ भेरे यांचा मराठा ढाबा ( Marathi Dhaba in Bhivandi ) आहे. त्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात हपडघा पोलीस ( Padgha Police arrest in Thane ) ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
![Dhaba owner beaten incident in CCTV : भिवंडीत जेवणाच्या बिलावरून ढाबा चालकाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद मारहाणीची घटना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14475098-450-14475098-1644926273687.jpg)
पडघा पोलीस ( Padgha Police arrest in Thane ) ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोन तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुंडलिक गोरले व सागर चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.
बिलाची मागणी करताच मारहाण
भिवंडी तालुक्यातील कासणे गावाच्या हद्दीत प्रमोद एकनाथ भेरे यांचा मराठा ढाबा ( Marathi Dhaba in Bhivandi ) आहे. १४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमाराला मराठा ढाब्यावर पुंडलिक गोरले व सागर चौधरी हे जेवणासाठी आले होते. मात्र, जेवण करून झाल्यावर बिल न देताच जात असताना ढाबा चालक भेरे यांनी जेवण्याचे पैसे मागितले. याच गोष्टीचा राग येऊन त्या टवाळखोराने शिवीगाळ करीत भेरेला मारहाण केली. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात ढाबा चालकाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा-Shivsena MLA Vaibhav Naik : आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल
ढाब्यासह हॉटेल चालकांना गावगुंडाकडून नेहमीच मारहाण
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर हाटेल ढाबे सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील ढाब्यासह हाँटेल चालकांना गावगुंडाकडून नेहमीच अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटना घडत असल्याने हाॅटेल- ढाबा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर ग्रामीण भागातील पोलिसांनी या परिसरात गस्त वाढविण्याची मागणीही व्यावसायिकांनी केली आहे.
हेही वाचा-Nagpur Crime : नागपुरात धारधार शस्त्र घेऊन खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक