ठाणे - धावत्या लोकलमधून पडून एका रेल्वे तिकीट तपासणीसचा (टीसी) मृत्यू झाला. ही घटना कल्याण-कसारा लोहमार्गावरील उंबरमाळी रेल्वे स्थानकानजीक घडली आहे. अरुण गायकवाड, असे लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या टीसीचे नाव आहे.
धावत्या लोकलमधून पडून टीसीचा मृत्यू - kalyan
आज सकाळी कसाराहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासणीचे काम करीत होते. तपासणी करीत असताना अचानक त्यांचा तोल जावून धावत्या लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झाले. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मध्य रेल्वेच्या कल्याण विभागात अरुण गायकवाड हे तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत होते. आज सकाळच्या सुमाराला ते कसाराहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासणीचे काम करीत होते. उंबरमाळी रेल्वे स्थानकानजीक दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशाचे तिकीट तपासणी करीत असताना अचानक त्यांचा तोल जावून धावत्या लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झाले. ही घटना कसारा व खर्डी दरम्यान कार्यरत असलेल्या लोहमार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलिसांना या घटनेची अद्यापही सविस्तर माहिती मिळत नसल्याने त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.