ठाणे -मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे आणि त्याविरुद्ध हनुमान चालीसा पठणच्या भूमिकेमुळे धार्मिक पुस्तक आणि ग्रंथांच्या दुकानात हनुमान चालीसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक धार्मिक संस्था आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून हनुमान चालीसाची दुकानात मोठी ( Hanuman Chalisa Book demand in shops ) मागणी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांनी येत्या ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवले ( mosque Loudspeaker Controversy ) नाहीत, तर प्रत्येक मशिदी बाहेर हनुमान चालीसाच पठण ( Hanuman Chalisach Pathan MNS ) करणार असल्याची भूमिका घेतल्याने हनुमान चालीसाची मागणी अधिक वाढणार असणार असल्याचे ठाण्यातील हनुमान चालीसा विक्रेत्यानी ( Hanuman Chalisa bookseller Thane ) सांगितले आहे.
हनुमानाच्या साहित्याची मागणी वाढली :राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे फक्त हनुमान चालीस चा खप वाढला नाही, तर पूजेच्या इतर साहित्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शनिवारी होत असलेल्या हनुमानाच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये गंध, हनुमान मूर्ती इत्यादींचा समावेश आहे. त्याबरोबर हनुमान चालीसा असलेल्या सिडींची देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.