ठाणे -आज दिवसभर विधानसभेत मनसुख हिरेन प्रकरणात गदारोळ झाला. त्यानंतर संध्याकाळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हिरेन मनसुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ठाकरे सरकारमध्ये पोलीस गुंड असल्यामुळे या कुटुंबाला धोका आहे. म्हणून त्यांना विशेष सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
मनसुख यांच्या कुटुंबियाना सुरक्षा द्या; किरीट सोमय्या यांची मागणी - thane latest news
आज दिवसभर विधानसभेत मनसुख हिरेन प्रकरणात गदारोळ झाला. त्यानंतर संध्याकाळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हिरेन मनसुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
![मनसुख यांच्या कुटुंबियाना सुरक्षा द्या; किरीट सोमय्या यांची मागणी किरीट सोमय्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10942118-881-10942118-1615313486662.jpg)
मनसुख हिरेन यांचे कुटुंबीय प्रचंड भितीमध्ये आहे. त्यांना पोलिस गुंडांकडून भीती आहे. जर त्यांना संरक्षण दिले नाही तर धनंजय गावडे आणि सचिन वाझे हे शिवसेनेचे गुंड आहेत. त्यांना या गुंडांकडून धोका आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
एनआईए तपासा बाबत बोलणार नाही-
एनआईए ही संस्था त्यांच्या हिशोबाने तपास करत आहे. त्यांच्याबाबत काही बोलणे योग्य नाही त्यांना तपास करू द्या. हिरेन परिवार दोघांना आवश्यक ती मदत करणार आहे, असे यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितले.
हेही वाचा-राज्यात मंगळवारी 9 हजार 927 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 56 मृत्यू