नवी मुंबई :तरुणी एकटीच असल्याचा फायदा उचलत पनवेलमध्ये एका डिलिव्हरी बॉयने चक्क तरुणीचा विनयभंग (delivery boy molesting girl in Panvel) केला. या घटनेने घाबरलेली तरुणी घरात पळाली. तरुणी घरात गेल्याची संधी साधुन तो डिलिव्हरी बॉय तेथून पसार (delivery boy absconded after molesting girl) झाला.
तरुणी एकटी पाहून विनयभंग :पनवेल तालुक्यातील कोन गावाजवळ असलेल्या 'इंडीयाबुल्स' या उच्चभ्रू इमारतीमध्ये मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सूमारास एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीने स्विगी, या अन्नपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून अन्नपदार्थ मागवले. डिलिव्हरी बॉयने खाद्यपदार्थ तरूणीला दिल्यावर त्या खाद्यपदार्थाचे पैसे घेतले. तरूणी घरात एकटी असल्याचे पाहून या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग (Delivery Boy molested Girl) केला.