लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना टीएमटी बसमध्ये 'No Entry', ठाणे पालिकेचा महत्वपूर्ण निर्णय
ठाण्यातून कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रभावीपणे व्यापक मोहीम राबवित आहे. लस हा एकमेव उपाय असून ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या माध्यमातून इतर नागरिकांना प्रादुर्भाव होवू शकतो, या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.
ठाणे -ठाण्यातून कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रभावीपणे व्यापक मोहीम राबवित आहे. लस हा एकमेव उपाय असून ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या माध्यमातून इतर नागरिकांना प्रादुर्भाव होवू शकतो, या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.