महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंब्रा - कळवा दरम्यान रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू; दिवसभरातील तिसरी घटना

तीन घटना आज सकाळी ९ ते 11 वाजण्याच्या दरम्यान घडल्या. यात दरवाजात अभे असलेले तिघे लोकलमधून पडले. मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला.

death
रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

By

Published : Feb 5, 2020, 4:07 PM IST

Updated : Feb 5, 2020, 5:59 PM IST

मुंबई- रेल्वेतून पडून पुन्हा एकाचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा कळवा दरम्यान ही घटना घडली आहे. रेल्वेतील गर्दीमुळे अपघातांची संख्या वाढतच आहे. मात्र, या घटनांकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करत असल्याचे समोर आले आहे.

मुंब्रा - कळवा दरम्यान रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू; दिवसभरातील तिसरी घटना

हेही वाचा -चोरट्यांनी लॉक तोडून दुचाकी पळवली; घटना सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, अशाच तीन घटना आज सकाळी नऊ आणि 11 वाजण्याच्या दरम्यान घडल्या. यात दरवाजात अभे असलेले तिघे लोकलमधून पडले. मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. उत्तरप्रदेश येथील राहणारे हाजी रईस अहमद या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर, मुंब्रा अमृतनगर येथील राहणारे इम्तियाज गुलाम हैदर स्केच आणि अबू ओसामा हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात रेल्वे पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे

दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि त्याप्रमाणे कमी असलेल्या लोकल यामुळे मध्य रेल्वेत मृत्यू होणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. रेल्वेतून आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. रेल्वेच्या कितीही फेऱ्या वाढवल्या तरीही, गर्दी कमी होत नाही. त्यामुळे चाकरमान्यांना वेळप्रसंगी दरवाज्यात लटकत प्रवास करावा लागतो. अनेकवेळा दरवाज्यात उभे असलेले प्रवाशांचा हात सुटल्याने सरळ रेल्वे रुळावर पडतात व त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर, कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

Last Updated : Feb 5, 2020, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details