महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात ५० हजार न भरल्याने तब्बल 15 तास मृतदेह कुटुंबीयांना नाही दिला - Dead body kept held by private hospital in Thane for 15 hours

कोरोनाचा वाढता संसर्गामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यातच रुग्णांच्या मृत्यनंतरही रुग्णालये नातेवाईकांना छळ करताना दिसत आहेत. तब्बल 15 तास उलटून देखील मृतदेह देण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करावी, यासाठी नातेवाईकांनी नौपाडा पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Dead body kept held by private hospital in Thane for 15 hours as relatives failed to give bill
बिल दिले नाही म्हणून 15 तास मृतदेह देण्यास नकार; नौपाड्याच्या खासगी रुग्णालयात प्रकार

By

Published : May 6, 2021, 7:57 AM IST

Updated : May 6, 2021, 1:45 PM IST

ठाणे :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे मृत्यच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असताना, ठाण्यातील खासगी रुग्णालयाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मृत रुग्णांचे बिल न भरल्यामुले रुग्णालयाने नातेवाईकांना तब्बल 15 तास मृतदेह दिला नाही. नौपाडा भागातील प्रिस्टीन रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

बिल दिले नाही म्हणून 15 तास मृतदेह देण्यास नकार; नौपाड्याच्या खासगी रुग्णालयातील प्रकार

कोरोनाचा वाढता संसर्गामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यातच रुग्णांच्या मृत्यनंतरही रुग्णालये नातेवाईकांना छळ करताना दिसत आहेत. तब्बल 15 तास उलटून देखील मृतदेह देण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करावी, यासाठी नातेवाईकांनी नौपाडा पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मंगळवारी राबोडी येथे राहणाऱ्या 44 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना पालिकेच्या वॉर रूमच्या माध्यमातून नौपाड्यातील प्रिस्टीन रुग्णालय पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेची तब्बेत अचानक बिघडली असल्याचे नातेवाईकांना कळवण्यात आले होते. दरम्यान मृत्यू झाल्यानंतर आधी 50 हजार भरा आणि नंतर मृतदेह ताब्यात घ्या, असे वारंवार त्यांना सांगण्यात आले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, रुग्णाचा मृत्यू मंगळवारी रात्री 2 वाजता झाल्याचे समजले. नातेवाईकांनी 40 हजार आगाऊ रक्कम भरली होती. त्यानंतर उर्वरित रक्कम भरायला सांगण्यात आले होते. त्यापैकी त्यांनी 10 हजार रुपये जमा केले असल्याचे प्रिस्टीन रुग्णालयाचे मालक डॉ. सागर कसबजे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हेही वाचा :पोलिसांकडून वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण: आरोग्य कर्मचाऱ्यांचे आज कामबंद आंदोलन

Last Updated : May 6, 2021, 1:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details