ठाणे -गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने राज्यात हाहाकार उडवला आहे. पूर आणि दरडी कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच मुंब्र्यात एका इमारतीच्या प्रवेश द्वाराजवळील भाग खचल्याने एकच खळबळ उडाली. मुंब्र्यातील ठाकूरपाडा येथील स्वस्तिक इमारत ही एका मोठ्या नाल्याच्या बाजूला बांधली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार होती. केवळ दहा वर्ष जुन्या असलेल्या या आठ मजली इमारतीत तब्बल 40 फ्लॅट्स आहेत. आज अचानक या इमारतीच्या प्रवेश द्वारासमोरील भाग खचल्याने एकच गोंधळ उडाला.
इमारतीला असलेला धोका पाहता घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. या सर्वांना जवळच्या महापालिका शाळेत ठेवले असून, ही संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.
40 कुटुंबाना शाळेत हलवले -