महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

dahihandi 2021 : कोरोना निर्बंधांमुळे कुंभार समाजास आर्थिक फटका

श्रावण महिन्यात येणाऱ्या रक्षाबंधन सणानंतर सर्वात मोठा सण असलेल्या दहीहंडी उत्सवावर राज्य सरकारने उशिरा निर्बंध जाहीर केला आहे. यामुळेच दहीहंडीसाठी मटकी तयार करणाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसल्याचा आरोप कुंभार समाजाने केला आहे.

By

Published : Aug 26, 2021, 3:09 PM IST

Updated : Aug 26, 2021, 3:56 PM IST

ठाणे - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता, राज्य सरकारने जरी अनेक व्यवसायात शिथिलता दिली आहे. मात्र श्रावण महिन्यात येणाऱ्या रक्षाबंधन सणानंतर सर्वात मोठा सण असलेल्या दहीहंडी उत्सवावर राज्य सरकारने उशिरा निर्बंध जाहीर केला आहे. यामुळेच दहीहंडीसाठी मटकी तयार करणाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसल्याचा आरोप कुंभार समाजाने केला आहे.

याही वर्षीचा दहीहंडी उत्सव कोरोनाच्या सावटाखाली

कोरोना रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेतही आटोक्यात आल्यानंतर सरकारने राज्यभरात निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले. मात्र प्रत्येक सणांवर निर्बंध आजही कायम ठेवले आहेत. यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षीचा दहीहंडी उत्सवदेखील कोरोनाच्या सावटाखाली आहे. त्यातच राज्य सरकारने सर्वजनिक दहीहंडी उत्सवाची परवानगी नाकारली आहे. यामुळे दहीहंडी उत्सवावर गदा आल्याने दहीहंडीसाठी मटकी तयार करणाऱ्या कुंभार व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.

जमापुंजी गुंतवणूक करून दहीहंडीसाठी मटक्या

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेकडो कुंभार समाजातील कारागीर आपल्या जवळील जमापुंजी गुंतवणूक या व्यवसायात दिवस-रात्र मेहनत करून मातीची मडकी बनवतात. तसेच दहीहंडीच्या मटक्यावर आकर्षक रंगरंगोटी करतात. आता दहीहंडीसाठी तयार केलेल्या शेकडो मटक्याचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे व आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुंभार वर्गाकडून होत आहे.

Last Updated : Aug 26, 2021, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details