महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात फुटली दिव्यांगांची दहीहंडी; 28 वर्षांपासून महोत्सवाचे आयोजन

पुनर्जिवन सामाजिक ट्रस्ट व महासरस्वती हिंदू ह्रदयसम्राट यांच्यामार्फत मागील 28 वर्षांपासून दिव्यांगांसाठी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

दहीहंडी फोडताना दिव्यांग विद्यार्थी

By

Published : Aug 20, 2019, 10:39 AM IST

Updated : Aug 20, 2019, 10:58 AM IST

ठाणे -दहीहंडी उत्सवाच्या पाच दिवस आधी ठाण्यात दिव्यांग अवयवदान ह्रदयस्पर्शी दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे आयोजन बाळगोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ, पुनर्जिवन सामाजिक ट्रस्ट व महासरस्वती हिंदू ह्रदयसम्राट यांच्यामार्फत करण्यात आले होते.

महोत्सवाचे आयोजक विलास ढमाले आयोजक यांची प्रतिक्रिया

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात जिद्द निर्माण व्हावी, या उद्देशातून मागील 28 वर्षांपासून सातत्याने हे कार्य या ट्रस्ट मार्फत होत आहे. तसेच दिव्यांगांमध्ये वह्या तसेच बी काँप्लेक्स सारख्या टॉनिकचे वाटपही करण्यात येते. या दहीहंडी महोत्सवामध्ये कोणत्याच प्रकारची स्पर्धा न घेता सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना समान बक्षीस देण्यात येते. या महोत्सवातून अवयवदान करण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यास येत आहे.

या दहीहंडी महोत्सवात १२ शाळांच्या ३७८ दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक विलास ढमाले यांनी दिली.

Last Updated : Aug 20, 2019, 10:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details