महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उधारीच्या वादातून ग्राहकाने फोडले ढाबा मालकाचे डोके; मालक जखमी - Thane crime news

उधारीवरुन ढाबा मालक आणि ग्राहकामध्ये वाद होऊन ग्राहकाने लोखंडी रॉडने ढाबा मालकाचे डोके फोडल्याची घटना समोर आली आहे. या नंतर संबंधीत ग्राहक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस करत आहेत.

customers-shook-the-head-of-the-dhaba-owner-after-asking-for-money-to-borrow
उधारीच्या पैशांवरुन ग्राहकाने फोडले ढाबा मालकाचे डोके; मालक जखमी

By

Published : Feb 22, 2020, 12:07 PM IST

ठाणे -उधारीवरून ढाबा मालक आणि ग्राहकामध्ये वाद होऊन ग्राहकाने लोखंडी रॉडने ढाबा मालकाचे डोके फोडून गल्ल्यातील १५ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील टर्निंग पॉईंट धाब्यावर घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हल्लेखोर ग्राहका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतकुमार सोनकांबळे (वय.५४) असे मारहाण झालेल्या ढाबा मालकाचे नाव आहे. विशाल शेलार (रा. वसारगाव, अंबरनाथ) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर ग्राहकाचे नाव असून तो फरार झाला आहे.

उधारीच्या पैश्यांवरून ग्राहकाने फोडले ढाबा मालकाचे डोके; मालक जखमी

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबरनाथ तालुक्यामधील टर्निंग पॉईंट धाबा आहे. या धाब्यावर मालक शांतकुमार सोनकांबळे हे गुरुवारी रात्रीच्या सुमाराला इतर गिऱ्हाकांची जेवणाची ऑर्डर घेत होते. त्याच सुमाराला आरोपी विशाल हा धाब्यावर आला होता. त्यावेळी त्याने चिकन हांडी व भाकरीची ऑर्डर दिली. मात्र मालक शांतकुमार यांनी भाकरी नाहीत मी दुसरीकडून आणून देतो, यापूर्वीच्या उधारीचे ३ हजार ६०० रूपये झालेत असे सांगितले. त्यावर आरोपी विशाल याने माझ्याकडे पैसे कसे मागतो, माझ्याकडून कोण पैसे मागत नाही. असे बोलून धाब्याच्या गल्ल्यात हात टाकून १५ हजाराची रोख रक्कम जबरीने काढून घेतली. मालक शांतकुमार यांना शिवीगाळी करत हातातील लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. मालकाला मारहाण होत असल्याचे पाहून धाब्यावरील कुक विष्णु परीहार हा मालकाला वाचविण्यासाठी आला. मात्र, आरोपी विशाल याने त्यालाही शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यानी मारहाण केली. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपी विशाल शेलार विरूद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. अधिक तपास सह पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details