ठाणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेल्टा व्हेरिएंट व्हायरसमुळे ठाणे जिल्हा हा तिसऱ्या लेव्हलमध्ये पुन्हा जैसे थे प्रमाणे आला आहे. त्यामुळे शासनाने कडक निर्बंध लादले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाण्यालगत असणारे मुंब्रा देवी डोंगराच्या बाजूला असणारा धरण, तलाव, नदी पात्र, ओढे आणि धबधब्यावर मुंब्रा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचे पोलिसांकडून आवाहन
विकेंडमध्ये पिकनिक स्पॉट म्हणून अनेक पर्यटक या स्थळी मौजमजा करण्यासाठी येत असतात. त्यामुळे अशा भागात गर्दी होऊन कोरोनाला आव्हान देण्याचे काम पर्यटनप्रेमी करत असल्याने पोलिसांनी या ठिकाणी नागरिकांना पळवून लावले आहे. त्याचबरोबर जमाव बंदीची कारवाई देखील करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर नागरिकांनी आपला जीव धोक्यात न घालून अशा ठिकाणी न येण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले. याच धबधब्यावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी.