महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अविनाश जाधव यांना न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर झाले रक्षाबंधन

अविनाश जाधव यांना न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अविनाश जाधव न्यायालयाबाहेर येताच मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी अविनाश जाधव यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.

mns
अविनाश जाधव यांना न्यायालयीन कोठडी

By

Published : Aug 3, 2020, 7:20 PM IST

ठाणे - मनसे नेते अविनाश जाधव यांचा जामीन ठाणे दिवाणी न्यायालयाने फेटाळल्यानंतर ठाणे सत्र न्यायालयात वकिलांनी अपील केले होते. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने 6 ऑगस्टला सुनावणीची तारीख ठेवली आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई आणि वकील ओमकार राजूरकर यांनी यासंदर्भातली माहिती दिली.

अविनाश जाधव यांना न्यायालयीन कोठडी

दरम्यान, सर्व खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच मनसे नेते अभिजित पानसे यांनी देखील याबाबत योग्यवेळी उत्तर मिळेल, आम्ही गप्प बसणार नसल्याचे सांगितले आहे.

न्यायालयाबाहेर महिलांनी अविनाश जाधव यांना बांधली राखी

न्यायालयाबाहेर महिलांनी अविनाश जाधव यांना बांधली राखी -

अविनाश जाधव यांना न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अविनाश जाधव न्यायालयाबाहेर येताच मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी अविनाश जाधव यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांमध्ये भावूक वातावरण निर्माण झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details