महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडून भ्रष्टाचार - प्रताप सरनाईक - आमदार गीता जैन

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन यांनी केला आहे. आज सरनाईक आणि जैन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण मीरा भाईंदर महापालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निर्धार केला असल्याचे देखील ते यावेळी म्हणालेत.

Mira Bhayander Municipal Corporation
आमदार प्रताप सरनाईक

By

Published : Oct 26, 2020, 4:27 PM IST

ठाणे -मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन यांनी केला आहे. आज सरनाईक आणि जैन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण मीरा भाईंदर महापालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निर्धार केला असल्याचे देखील ते यावेळी म्हणालेत.

आमदार प्रताप सरनाईक यांचे भाजपविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपची गेल्या तीन वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. येथील जनतेने भाजपला कौल दिला, मात्र भाजपने जनतेचा विश्वासघात केल्याचे सरनाईक यांनी म्हंटले आहे. अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत आल्या आहेत, त्यामुळे निश्चितच मीरा भाईंदमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. येणाऱ्या काळात मीरा भाईंदर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असेल. आमदार गीता जैन आणि मी एकत्र येऊन शहराचा विकास करू, आणि मीरा भाईंदर महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करू असे यावेळी आमदार सरनाईक म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details